घेता वाहूनी गुरुसेवेसी
येई चित्त था-यावरी
सकल दोष पीडा हरिती
आशिर्वाद जयाचा शिरी ॥
आयुष्य सार्थकी लागता
गुरु सहवासातून
ध्येयाची ज्योत वसते
अंत:करणातून ॥
आभाळमाया प्रेम सागरी
न कधी लोपे
भक्तांवर फुंकर घालण्या
विनाशतात त्यांची पापे ॥
प्रपंचातून आयुष्य जगता
बैसलो ताटावरी परमार्थाते
एक एक वाटी प्राशन करिता
अमृतवाणी प्रकाशते ॥
नित्य सेवेचा वसा दिला
सदगुरू वाणीने
ध्यान धरिता आपण प्रकटता
पाऊल पडे विवेकाने ॥
गुरु साक्षात परमेश्वर
नित्य असे मनी विचारी
जरी असलात दूरवरी
हृदयी वसावे निरंतरी ॥
येई चित्त था-यावरी
सकल दोष पीडा हरिती
आशिर्वाद जयाचा शिरी ॥
आयुष्य सार्थकी लागता
गुरु सहवासातून
ध्येयाची ज्योत वसते
अंत:करणातून ॥
आभाळमाया प्रेम सागरी
न कधी लोपे
भक्तांवर फुंकर घालण्या
विनाशतात त्यांची पापे ॥
प्रपंचातून आयुष्य जगता
बैसलो ताटावरी परमार्थाते
एक एक वाटी प्राशन करिता
अमृतवाणी प्रकाशते ॥
नित्य सेवेचा वसा दिला
सदगुरू वाणीने
ध्यान धरिता आपण प्रकटता
पाऊल पडे विवेकाने ॥
गुरु साक्षात परमेश्वर
नित्य असे मनी विचारी
जरी असलात दूरवरी
हृदयी वसावे निरंतरी ॥
Comments
Post a Comment