Skip to main content

Posts

|| श्री देवी ||

 
Recent posts
 लहानपणी किल्ला केल्यावर सतत पाणी न मारल्याने माती दुभंगली जायची पण मनं मात्र कधीच दुभंगली नाहीत, कारण मनं न दुभंगणं हे सजीवतेचं लक्षण होतं तर कोरडेपणा असणं हे निर्जीवतेचं. ह्याच ओलावा जपणाऱ्या नात्याला आपण सण म्हणतो, कारण रोज एकत्र नसलो तरी एकत्र आल्यावर कोरडेपणाची दरी कधीच दिसत नाही, तर असतो तो एकत्रपणाचा गोडवा...

।।श्री लक्ष्मी प्रसन्न।।

 
गुरु आम्ही झालो आपल्या चरणी लीन, आपले असणे गुरुचे ते स्थान ॥धृ॥ न कळे पामराला शक्तीचे ते रुप देह-बुद्धी नासले संसारी या ताप, क्षुद्र जीव आम्हाला चिंता आणि व्याप सांभाळीता सर्व लागते हो धाप ॥१॥ जगणे हे असले व्याधींनी भरलेले सुख हे जीवनात क्षणिक राहिलेले, दारोदारी फिरता हेच आहे पाहिलेले कोणी म्हणतो नुसतेच आपल्याला वाहिलेले ॥२॥ मनी भाव दाटतो करा आता उद्धार दर्शनासी आम्हा उघडा हो दार, विनवणी करिता धाव घ्या कृपावर करिता दंडवत उजळा एक वार ॥३॥ आकाश ते ठेंगणे झाले दर्शनाने कृपा कवच आपले आले आशिर्वादाने, गातो आपले गुणगान भक्त आनंदाने वंदितो पुनः चरणी पाप हे फेडणे ॥४॥
आठवणींचा अलबम आठवणींच्या अलबम मधले फोटो बसले रुसून विचारलं काय झालं? तर फिरवली मान नाक उडवून प्रयत्न केला आठवायचा त्या मनमोहक क्षणांना दूर लोटायला बघितलं त्या अहंकारी विचारांना मग मात्र खैर नव्हती माझ्या नशिबाची ओढवून घेतलं संकट लाज होती माझ्या आंधळेपणाची बुरखा फाडायला आज लागत होता जोर भरपूर जवळची माणसे दिसू लागली अंधूक आणि नकाराचा सूर होती कोणीतरी आयुष्याचं गलबत किनाऱ्याला लावणारी पण मी विसरलो त्यांना अन्‌ झालो व्यवहारी नकाराचा सकार केला आयुष्याचा अंधार गेला कळीचे फूल करुन त्यांनी दाखविले जगाला त्या सुंदर क्षणांना कसे विसरलो मी? जाणिव झाली आता मस्तीला करु कमी हा एवढा ठोका कळला बरं का स्पंदनांना शहारले मन अन्‌ पारावार नाही उरला स्मृतींना मागे पडलो होतो कुठेतरी आपली माणसे हरवून झरझर सरकले क्षण खरंच गेलो आनंदून काळ होता सुखाचा, मजेचा, बहरण्याचा आठवला हळूच हात त्यांचा आशिर्वादाचा आयुष्याची ती सहल होतीच भारी कितीही संकटांवर मात करण्यास होती आशेची उभारी हळूहळू आठवणींच्या अलबम मधले फोटो झाले हजर मी परत त्यांच्यात जाताना त्यांचा बदलला कलर सुरेख आणि रमणीय सहवासाला मुकलो होतो फार फ...
निर्माल्य (माझी आजी) डोळे होते थकलेले शरीर पिंपळाच्या पानाची जाळी ल्यालेले आपल्याच माणसांच्या ओढीने, प्रेमाने, वावराने राहिली क्रियाशील सदैव तत्परतेने आपली दुःखे दाबताना ती दुसऱ्याचा बनली आधार निरलस स्वभावाने आणि प्रेमाच्या धाग्याने जोडली तिने माणसे हजार बाळा हे प्रेमाचे शब्द हक्काने ऐकावे तर तिच्याकडून काही चूक झाली तरी माफ करणारे कोणीच नव्हते ती सोडून दुसऱ्याचे चांगले व्हावे यासाठी झटणारी होतीच ती वेगळी आपल्याच माणसांच्या आनंदात , समाधानी असे ती माय आगळी समाधानाचे हसू आणि आसू कायम असे तिच्या अंतर्मनी ती असताना निर्धास्त असायचो आम्ही , चिंताच नसे ध्यानीमनी सोवळे आणि शास्त्र याबद्दल असे कायमच ती आग्रही कालौघात सोवळ्याच्या निऱ्या सैल सोडताना कर्तव्याकडे दुर्लक्ष नाही कोणाचे कोण , जवळचे कोण , कोणीच नव्हते परके हक्काने स्वागत करणे , प्रेमाने जवळ करणे हे सगळ्यांशी होते सारखे आई - बाबा ओरडू नयेत म्हणून सतत बिचारी करी धडपड तरीही फटके बसलेच तर म्हणायची थांबव आता ओरड ...
जीवन हे प्रवाहासारखं वाटतं कधी कधी मार्ग बदलेल तसं वाहणारं, नाहीतर सरधोपट वाटेनं जाणारं, वाटेतील खड्ड्यांना आपलं करणारं वा त्यांच्याशिवाय पुढे जाणारं..... खरंच किती विचित्र वाटतं ना हे सगळं.. तिच्यावरच सगळं अवलंबून असणारं.... तिच्याविना फुकट असणारं... मोडलेल्या मनाला आधार तिचा उन्मळून पडलेल्या शरीराला पाठींबा तीचा.. मरायला निघालेल्या जीवालाही मागं सारणारी तीच आणि आनंदातही साथ देणारी तीच... तीच ती आशा..........!!!!!!!!! जीवनाला जीवन म्हणायला लावणारी आणि जगण्याला अर्थ देणारी...