गुरु आम्ही झालो आपल्या चरणी लीन, आपले असणे गुरुचे ते स्थान ॥धृ॥ न कळे पामराला शक्तीचे ते रुप देह-बुद्धी नासले संसारी या ताप, क्षुद्र जीव आम्हाला चिंता आणि व्याप सांभाळीता सर्व लागते हो धाप ॥१॥ जगणे हे असले व्याधींनी भरलेले सुख हे जीवनात क्षणिक राहिलेले, दारोदारी फिरता हेच आहे पाहिलेले कोणी म्हणतो नुसतेच आपल्याला वाहिलेले ॥२॥ मनी भाव दाटतो करा आता उद्धार दर्शनासी आम्हा उघडा हो दार, विनवणी करिता धाव घ्या कृपावर करिता दंडवत उजळा एक वार ॥३॥ आकाश ते ठेंगणे झाले दर्शनाने कृपा कवच आपले आले आशिर्वादाने, गातो आपले गुणगान भक्त आनंदाने वंदितो पुनः चरणी पाप हे फेडणे ॥४॥