Skip to main content


जीवन हे प्रवाहासारखं वाटतं कधी कधी
मार्ग बदलेल तसं वाहणारं,
नाहीतर सरधोपट वाटेनं जाणारं,
वाटेतील खड्ड्यांना आपलं करणारं वा
त्यांच्याशिवाय पुढे जाणारं.....

खरंच किती विचित्र वाटतं ना हे सगळं..

तिच्यावरच सगळं अवलंबून असणारं....
तिच्याविना फुकट असणारं...

मोडलेल्या मनाला आधार तिचा
उन्मळून पडलेल्या शरीराला पाठींबा तीचा..

मरायला निघालेल्या जीवालाही मागं सारणारी तीच
आणि आनंदातही साथ देणारी तीच...


तीच ती आशा..........!!!!!!!!!

जीवनाला जीवन म्हणायला लावणारी
आणि जगण्याला अर्थ देणारी...

Comments

Popular posts from this blog

|| श्री देवी ||

 

॥श्री स्वामी समर्थ॥

।।श्री लक्ष्मी प्रसन्न।।