Skip to main content


आठवणींचा अलबम

आठवणींच्या अलबम मधले फोटो बसले रुसून
विचारलं काय झालं? तर फिरवली मान नाक उडवून

प्रयत्न केला आठवायचा त्या मनमोहक क्षणांना
दूर लोटायला बघितलं त्या अहंकारी विचारांना

मग मात्र खैर नव्हती माझ्या नशिबाची
ओढवून घेतलं संकट लाज होती माझ्या आंधळेपणाची

बुरखा फाडायला आज लागत होता जोर भरपूर
जवळची माणसे दिसू लागली अंधूक आणि नकाराचा सूर

होती कोणीतरी आयुष्याचं गलबत किनाऱ्याला लावणारी
पण मी विसरलो त्यांना अन्‌ झालो व्यवहारी

नकाराचा सकार केला आयुष्याचा अंधार गेला
कळीचे फूल करुन त्यांनी दाखविले जगाला

त्या सुंदर क्षणांना कसे विसरलो मी?
जाणिव झाली आता मस्तीला करु कमी

हा एवढा ठोका कळला बरं का स्पंदनांना
शहारले मन अन्‌ पारावार नाही उरला स्मृतींना

मागे पडलो होतो कुठेतरी आपली माणसे हरवून
झरझर सरकले क्षण खरंच गेलो आनंदून

काळ होता सुखाचा, मजेचा, बहरण्याचा
आठवला हळूच हात त्यांचा आशिर्वादाचा

आयुष्याची ती सहल होतीच भारी
कितीही संकटांवर मात करण्यास होती आशेची उभारी

हळूहळू आठवणींच्या अलबम मधले फोटो झाले हजर
मी परत त्यांच्यात जाताना त्यांचा बदलला कलर

सुरेख आणि रमणीय सहवासाला मुकलो होतो फार
फोटो म्हणाले जराशी फिरवल्यावर नजर तुझ्या आनंदाला नाही उरला पारावार

घरघर लावली काल्पनिक जगाच्या प्रवासाला
आलो परत फिरुनी आपल्या हक्काच्या घराला, आपल्या हक्काच्या घराला...

Comments

Popular posts from this blog

|| श्री देवी ||

 

॥श्री स्वामी समर्थ॥

।।श्री लक्ष्मी प्रसन्न।।